मागे काही दिवसांपुर्वी पंडित.कैवल्यकुमार_गुरव यांना भेटण्याचा योग आला. बरेच जणांना अजुन माहीत ही नाहीत पं.कैवल्यकुमार कोण आहेत ते.
पं.कैवल्यकुमारजी किराणा घरण्यातील गायक सर्वात कमी वयात पंडित ही पदवी मिळवणारे गायक. त्यांच्या मैफिलीला गेलो होतो, त्या आधी कधी त्यांना ऐकल नवत पण बरेच जण म्हणले खुप छान गातात ते. अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी राग मधुवंती घेतला 30 मिनिटे राग मधुवंती गात होते पण शास्त्रीय गायनातील फारसी माहीती नसलेले प्रेक्षक 20-25 मिनिटा नंतर उठुन जात होते. जेव्हा त्यांनी भजनाला सुरुवात केली रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाली पुढील 1 ते 1:30 तासाची कोणाला चाहुलच लागली नाही. आलाप घेतानी मंद्र सप्तकातुन तार सप्तकात जाताना माणसाच्या अंगावर काटा यायचा ईतके अप्रतिम गायन.
संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांची मुलाखत सुरु होती मुलाखती मध्ये त्यांना बरेच प्रश्न विचारले गेले फारसे आठवत नाही पण एक गोष्ट माझ्या अजुनही लक्षात आहे.
घराणा कुठलाही असो शास्त्रीय संगीत ऐकायला हव , एकदा जो शास्त्रीय संगीत ऐकेल व समजेल तो त्यातुन कधीच बाहेर पडणार नाही. पंडीत.कैवल्य कुमारजी यांचे हे शब्द आयुष्यभर लक्षात राहतील,
तुम्हालाही त्यांच्या बद्दल अधिक माहीती व त्यांचे कलेक्शन हवे असल्यास त्यांचा वेबसाईट ला भेट द्या.
www.panditkaivalyakumar.com/home.php