Krushna joshi
नमस्कार वाचक मित्रांनो.....
Friday, 1 November 2019
आई
कधी ती
कधी ती पाऊस वारा
कधी ती पाखराचे बोल
कधी ती अबोल
कधी ती आकाश दर्याहून खोल
कधी ती माझीच गझल
कधी ती वाट दाट धुक्याची
कधी ती स्वच्छंदी जगेल
कधी ती प्रेमात पडेल
कधी ती नात्यांना जपलं
कधी ती स्वप्न माझे
कधी ती भास असे
कधी ती भेटेल
मनाच्या गावात
कधी ती स्वप्न उतरवेल सत्यात.
स्पर्श
खुलून कळी फुल गंधीत व्हावे
आजचे अनुभव उद्या आठवणीत विरावे
आनंद कोणाला मोजता आले
मोजल्या का कोणी वेदना कधी
कुठल्या स्पर्शास भावना कुठली
पहिला स्पर्श असतो आईचा
नवजात जन्मलेल्या बालकाला
दुसरा स्पर्श बाबांचा
जबाबदारीचं ओझं घेतलेल्या हातांचा
ही भावना असते प्रेमाची मायेची
कधी स्पर्श होतो वासनेचा हा
देह कुस्करून टाकणाऱ्या राक्षसांचा
कधी स्पर्श होतो प्रेमाचा
अंगावरी काटा शहारणारा
देहात चैतन्य फुलवणारा
खरा स्पर्श तो निसर्गाचा
सोनेरी उन्हाचा कवडसा सावलीचा.
अहमदनगर
दिवाळी
नातीगोती हरवलेली
तुम्हीच सांगा रसिक प्रेक्षक हो
राहिली का दिवाळी पुर्वीसारखी रंगलेली,
धामधूम असायची दिवाळीची
चकल्या करंज्या लाडू चिवडा
आई आमची करत असायची,
आई आमची मदत करायची
हल्ली कुठे राहिला शेजार
काकू देखील शिकल्यात फराळ,
पहाटे उठून अभ्यंग स्नानाची
उटणे लावून अंगाला
किलोभर मळ काढण्याची
दिवाळी आहे म्हणे
करा तयारी फराळाची
अहो कसली आली दिवाळी
उत्सवात होत असायचे सण
मज्जा आता हरवली,
आपल्या खरेदीचे मुहूर्त लक्ष्मी पूजनावर गेले
नातीगोती विसरलेत हो सारे
बंद दारा आड होती दिवाळी
मनात फुटतात उत्सवांचे फटाके.
अहमदनगर
मृत्यू
किती क्षण राहिले
प्रत्येक क्षणाला माझे श्वास
मी तुझ्या श्वासात मोजले,
उरलो किती मी माझा
प्रश्न मला भेडसावत आहे
आता जगायाचे असे माझे
किती क्षण राहिले,
जीर्ण देहाचे जरी तुकडे झाले
प्रत्येक तुकड्यात तूझ्या सोबतीचे
श्वास आहे,
जरी सरणावर पेटली चिता माझी
त्या आगे मधूनी मी तुला पाहत आहे
तुझ्या हास्यात माझा श्वास अडकला आहे,
उरली जरी राख माझी
तुझ्या हाताने गंगेत सोडून दे
राखेत वाहून गेलो जरी मी
खरा मी तुझ्यात उरलो आहे.
तू पुन्हा येऊ नकोस
Monday, 1 April 2019
आरसा
त्यात तुझी छबी मला रोज दिसायची
तू स्वतःलाच आरश्यात पाहून निहरायचीस
दिसली असेल चोरून तुला पाह्तानाची माझी छबी
पण एक मात्र तू रोज त्याच वेळेला
आरश्या समोर उभी असायची
कधी वेणीची बट सावरायची
कधी डोळ्यांत काजळ भरायचीस
अन कधी त्या गुलाबी ओठांवर
लालीचा रंग चढवायचीस
हे मात्र खरं कि तू हे
माझ्याचसाठी करायचीस
नाही दिसलो कधी मी दारात उभा कि
तू कावरी बावरी व्हायचीस
हि सगळी गंम्मत तुझ्या त्या
नक्षीदार आरश्याची असायची.
- कृष्णा जोशी
Saturday, 23 March 2019
जुने लेखक आणि त्यांचे विचार
एकदा सहज Youtube वर गाणे ऐकत होतो आणि एक गाणं सुरू झालं सुरुवातीला मला वाटल प्रेम गीत आहे पुढे ऐकल्यावर लक्षात आलं ते तर विरह गीत आहे जे कवी ग्रेस यांनी लिहिलेलं आणि हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केले आहे, गीत असे होते
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे
हा सूर्य सोडवित होता,
पहिल्या 4 ओळीत वाटत हे प्रेयसीसाठी लिहिलं असावं पण ह्या गीताचा खरा अर्थ पुढच्या 4 ओळीत समजून येतो
ती आई होती म्हणुनी
घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध
पाचोळा उडवित होता,
ती गेली कोण प्रेयसी नाही हो, ती गेली ती आई होती आणि तिच्या साठी घनव्याकुळ मी रडत होतो
म्हणजे जिथे आपण पहिल्या चार ओळींमध्ये आपलेच तर्क लावत बसतो तिथे वरच्या चार ओळी मनाला भावुन टाकतात इथे समजते जुन्या लेखकांची विचारशक्ती, पुढे काय म्हणतायेत
अंगणात गमले मजला
संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा
कंदील एकटा होता.
बाल वयात आपल्यासाठी प्रिय आई असते आणि नेमकं त्याच वयात ती जाण्याने बालपणच हरवून जातं, आणि तेच आपल्या लेखणीतून किती सहजतेने आजूबाजूच्या सगळयाच गोष्टी मांडून टाकल्यात,
ह्या कवी ग्रेस यांच्या ओळी मला फारच भावुन गेल्या आहेत, जिथे आपली विचारशक्ती संपते तिथे यांचे विचार सुरू व्हायचे, जुने लेखक प्रभावी आहेतच आणि जुने लेखक वाचत रहा,
असे अनेक किस्से आहेतच पुढे नक्कीच सांगेल, आता पुरता राम राम.
- कृष्णा जोशी, अहमदनगर
https://www.instagram.com/kinchit_kavi/
Saturday, 23 February 2019
शोध माणसातल्या माणुसकीचा
शोध माणसातल्या माणुसकीचा ...
विचार करायची गोष्ट आहे ...
स्वार्थी झालयं जग आता
कोणालाच नाही कोणाची पर्वा
माझा मीच आहे खरा
असा दिसतोय माणुसकीचा चेहरा,
कसा घेणार ना आपण
शोध माणसातल्या माणुसकीचा
प्रत्तेकाचा रंग वेगळा,
हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई
सारेच आपण एक म्हणतो
खोटे पणा हा सारा
जाती जातीत आपण भांडतो,
कसा घेणार ना आपण
शोध माणसातल्या माणुसकीचा
प्रत्तेकाचा रंग वेगळा,
सापडेल माणुसकी तिथे
जिथे नसेल जात पात
जिथे नसेल कोणताच धर्म
जिथे असेल मानवता खरा धर्म.
- कृष्णा जोशी, अहमदनगर
Saturday, 2 February 2019
मी का नाही
कधी स्वतःला उलगडत नाही
नाकारलेच कोणी तर
विचारतो मी का नाही,
हवी असतात माणसे ती
नाकारलेच कोणी तर
विचारतो मी का नाही,
साकारत प्रत्तेक नाही
नाहीच साकारली तर
विचारतो मी का नाही,
नाहीच मिळाले सुख तर
विचार करत बसु नका
मी का नाही, मी का नाही.
Monday, 31 December 2018
असेही एकदा व्हावे
तू त्या वळणावर भेटावे
ढग दाटून यावे धुंद पावसाने बरसावे
चिंब चिंब तू अन मी भिजावे
अलगद त्या थेंबाने तुझे ओठ स्पर्शावे
धुंद या भिजतच राहावे ,
असेही एकदा व्हावे
मी येते सांगून
तू निघून जावे
तुझी वाट पाहत
मी त्या वळणावर बसावे
असेही एकदा व्हावे
दुःख तुझे, अश्रू माझे असावेत
सोबतीने तुझ्या मी खूप रडावे
अश्रूंच्या हुंदक्यात दुःख तू विसरावे
असेही एकदा व्हावे
लिहिलेल्या असाव्यात मी
अनेक कविता डायरीत माझ्या
तू तिचे शेवटचे कोरे पण निघावे
असेही एकदा व्हावे
तुझी चाहूल वाटावी
तुझे पाऊल वाजवे
तुझी भेट व्हावी
तू समोर उभी असावी
ते कोरे पण भरून निघावे
असेही एकदा व्हावे.
Saturday, 29 December 2018
रिकामा खिसा
पराकोटीचे कष्ट उचलले
नेत्याच्या त्या मागे फिरले
गल्ली गल्ली अन् फिरले वार्ड
उरले तुम्हास कार्यकर्त्यांनो काय
साहेब दादा भैया मेंबर
अनेक त्यांना दिले नाव
ताईसाहेब वाहिनीसाहेब आईसाहेब
अनेक त्यांना दिले नाव
उरले तुम्हास कार्यकर्त्यांनो काय
दोन वेळचे मिळाले भोजन
गाडीमधून साहेबाच्या चक्कर
तुम्हास मिळाले काय
त्यांनी कमावला बक्कळ पैसा
गाडी घोडी आणि बंगला
नाही कुठला तुम्हाला नोकरी-धंधा
कार्यकर्ता म्हणूच तू रहा
रिकामा खिसा घेऊ तू नेत्या मागे फिरत रहा
रिकामा खिसा घेऊ तू नेत्या मागे फिरत रहा.
Saturday, 22 December 2018
एकटेपणा
एकटेपणा आयुष्यभर
आपल्या सोबती आहे
त्याची जाणीव होते
जेव्हा मन उदासीन असते
सोबती कोणी नसते
ओढ कोणी तरी आपल
जवळच असाव अशी असते
मन मात्र एकट्यानेच जगत असते,
भरलेल्या माणसांच्या गर्दीत
हसत हसत विश्वासघात होतो
तेव्हाही मन एकटे असते
चार दिवसांच्या आनंदा नंतर
जेव्हा सारी शांतता असते
तेव्हाही मन एकटे असते
मनात जेव्हा विचारांचा
काहुर माजतो
मनातले शब्द जेव्हा
कागदावर उतरतात
तेव्हाही मन एकटे असते
जन्म एकट्याने मृत्यु एकट्याने
धन, दौलत सोबती काहीच नसते
मृत्यु नंतर सरणावरती धड
आपले एकटे असते.
- कृष्णा जोशी
http://www.Instagram.com/kinchit_kavi
Saturday, 17 November 2018
मैत्रीच्या विश्वात
"मैत्री" म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं छानसं जाळीदार पान आहे.
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातो.
मैत्री करणं सोपं असत पण ती टिकवणे अवघड, मैत्रीत राग लोभ, सुख दुःख , प्रेम या सगळया गोष्टी येतात मग त्यातून मैत्री टिकवणे म्हणजे खरी मित्रता, मैत्री वाऱ्याची झुळूक आहे अनेक नाते जोडून जाते अनेक नाते सोडून जाते, आपल्याला हवे तिकडे घेऊन जाते, मग कॉलेजचा कट्ट्यावर काढलेले ते दिवस आता पुन्हा येतील की नाही माहीत नाही, पण नकळत झालेली रुसवे-फुगवे आज आठवली तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी बरे वाटते आणि गालावर छान खळी खुलते, तीच हि मैत्री.
मैत्री मध्ये गैरसमज हा सगळ्यात महत्वाचा दुवा आहे. केव्हा,कुठे, कधी कसा मैत्री त गैरसमज निर्माण होईल काहीच सांगता येत नाही.पण जर एकमेकांना वर विश्वास असला तर मग गैरसमजला मैत्रित स्थान नाही. मैत्री ही बंधन कारक नको.
मैत्रीत "विश्वास" "त्याग" आणि एकमेकांशी मन मोकळे असणे खूप गरजेचे आहे, कारण मैत्रीचं नातं भावनेशी जोडलेलं आहे, ह्या मुळेच मैत्री खूप काळ टिकून हि राहते.
मैत्रीला बंधन नाही मैत्री कोणाशीही होते, आपल्या मैत्रिचा ठेवा हा सर्वांनी असाच जपुन ठेऊ. मैत्रीच्या विश्वात आपण इतके रमून गेलो असतो की दुरावण्याच्या कल्पनेने अंगावर अगदी काटा उभा राहतो. त्या आठवणी इतक्या गोड असतात कि त्यांना मन कधी दूर जाऊच देत नाही, म्हणूनच मैत्रीच नातं रक्ताच्या नात्यापेक्षा अमूल्य आहे. म्हणूनच मैत्रीच विश्व खूप खोल आहे.
कितीही नाकारली तरी मैत्री होते
अनोळखी असलो तरी मैत्री होते
नसतो इथे हेवा-देवा मैत्र असतो
फक्त आपण तेव्हा,
नसते सजवायची नसते गाजवायची
मैत्रीची नाती रुजवायची असते.
Saturday, 27 October 2018
या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे ह्या ओळी खरंच मनाला स्पर्शुन जातात, ९ महिने ९ दिवस आईच्या पोटात राहुन आईनेही यातना सहन करुन आपल्याला जन्म दिलाय आणि या आपल्या आयुष्यावर आपल्याही पेक्षा जास्त प्रेम कोणी केल असेल तर तेही आईने म्हणुनच या जन्मावर शतदा प्रेम करा,
जीवनाचे गीत व्हावे
एैसेची जगत रहावे
या जन्मावर शतदा प्रेम करावे.
( instagram | @kinchit_kavi )
Tuesday, 16 October 2018
स्पर्श
Monday, 15 October 2018
मला तुझ्या आठवणीतील कविता व्हायचय
मला तुझ्या आठवणीतील
कविता व्हायचय
नसेल तुला आवडत मी
तरी देखील प्रेम करायचय
मला मात्र तुझ्या आठवणीतील
कविता व्हायचय
रोज तुझ्या आठवणीत मन रमवायचय
तुझ्या निरागस रुपाला गोंजारायचय
मला मात्र तुझ्या आठवणीतील
कविता व्हायचय
तुला माझी होताना पाहायचय
तुझ्या स्मित हास्यात मनाला शहारायचय
तुझ्याकडे पाहतच राहायच
मला मात्र तुझ्या आठवणीतील
कविता व्हायचय
अन् अशीच तुझ्या आठवणीतील
कविता व्हायचय.
© कृष्णा जोशी
Thursday, 9 November 2017
आठवण
कित्तेक रात्री आठवणीत काढल्या
क्षणोक्षणी जुळवत स्वप्नी मने
कधी असे चंद्र-तारे साथीला
जागवत आठवणींचे मनी शहारे
का दिले तु दुखः अर्धावरती सोडुन सारे
पुन्हा तुटतील का तारे गाऊ प्रेम गीत प्यारे
ग सखे विसर हे दुखः सारे
होऊ एक जग आपले सारे
मारुन घट्ट मिठी गाऊ प्रेम गीत प्यारे .
✍ कृष्णा जोशी
Saturday, 21 October 2017
मोबाईल आरती
जय देव जय देव
जय मोबाईल देवा
आरती ओवाळु रात्रं दिवसा
जयदेव जयदेव जय...
व्हाॅट्स अॅप मध्ये मुल
गुंतुन राहती चॅटींग मध्ये
वेळ घालती
जयदेव जयदेव जय...
फॅसबुकवर पोस्ट टाकती
पाच पाच मिनिटाला लाईक पाहती ...
जयदेव जयदेव जय...
ईंस्टाग्राम ला फोटोचा
वर्षाव करतात,
मुलींचे फोटो लाईक
करतात ..
जयदेव जयदेव जय...
वाकड तोंड करुनी
मुली काढतात सेल्फी
कोणी कमेंट करतो का?
टवकारुन पाहतात ....
जयदेव जयदेव जय...
मोबाईल आमचा रोजचा
सोबती त्यावर काॅल करुन
बोलती गर्लफ्रेंड पोरांची ...
जयदेव जयदेव जय...
मित्रांनो थोडा मोबाईलला
आराम द्या त्यात पण
जीव आहे, थोडा वेळ
पुस्तक काढुन अभ्यास करा
अभ्यास करा ...
जयदेव जयदेव जय....
जय देव जय देव
जय मोबाईल देवा
आरती ओवाळु रात्रं दिवसा
जयदेव जयदेव जय...
© कृष्णा जोशी
Friday, 22 September 2017
कृष्णा कुठे हरवलाय तु..
कृष्णा कुठे हरवलाय ... अरे कृष्णा कुठे हरवलाय तु ...
द्वापारयुगात वावरणारा वस्त्रहरणापासुन वाचवणारा द्रौपदीचा भाऊ तु
कलियुगात पुन्हा जन्म घेवुन आई - बहीणीची अब्रु वाचीव तु,
या युगात कसले आलेत भाऊ ईथे सख्खाच झालाय वैरी
बापा पासुन परक्या पर्यंत ईथे करतात वस्त्रहरण सारे,
जगणार कशी ही माय - बहिण सांगणारे तु सांगणारे तु
कृष्णा ... अरे कृष्णा ... कुठे हरवलाय तु ...
ईथे पाहुन अंधळे झाल्या सारखे लोक वावरताय सारे
कोण जन्म घेणार वाचवाया अब्रु सांगणारे तु .. सांगणारे तु ,
कृष्णा ... अरे कृष्णा ... कुठे हरवलाय तु ...
दिवसांगणिक अनेक बलत्कार करुन
ते न्यायदेवतेच्या साक्षीने मुक्त श्वास घेऊन ते फिरताय,
पिडेने त्या घुटमळतेय माय - बहिण यांना न्याय कोण देणार.
सांग ... अरे सांग ... कृष्णा ... अरे कृष्णा ... कुठे हरवलाय तु ...
पुन्हा तु जन्म घे ह्या पापी लोकांना शिक्षा दे
आई - बहिणीला न्याय दे कृष्णा पुन्हा तु जन्म घे पुन्हा तु जन्म घे.
✍ शब्द - कृष्णा जोशी
Thursday, 21 September 2017
शब्द
शब्दांचा प्रवास शब्दांनी केला की
शब्द ही कवितेचा रुपाने धावतात,
मग त्या शब्दातच आपुलकी राहते
शब्दात सर्वांना बांधता पण येते,
कारण प्रेत्तेकाचा प्रवास हा शब्दावरुन
शब्दावर येऊन थांबलेला असतो,
मग प्रेम, माया, आपुलकी, बंधन
राग, लोभ, ह्या क्रिया शब्दातुन उमटतात,
शब्दाने शब्दाला धरलेल आहे
आपणही शब्दातच गुंतुन राहायच.
मग त्या शब्दातुन केलेली कविता
प्रत्तेकाच्या मनात त्या शब्दांनी भावलेली असेल.
✍शब्द :- कृष्णा जोशी
Monday, 11 September 2017
पाऊस
हा लाघवी पाऊस
मनात रिमझिम करतो
कधी थोडासा तर कधी
मुसळधार बरसतो,
विरुण गेल्या तुझ्या
भेटीचा आनंद घेऊन येतो
तुझ्या हास्या सारखा
हा धुंद पाऊस,
तुझ्या केसात रंग
बावरा हा पाऊस
तुझ्या ओठांत उन्मन
हा पाऊस,
तु आणि तु
फक्त पाऊस
तुझ्या मिठीने
मी ही फक्त पाऊस.
✍ शब्द - कृष्णा जोशी
दि. 11-09-2017
Saturday, 5 August 2017
मैत्री
न जाणे कुठुन कसा देव
मैत्रीचे नाते जुळवतो,
अनोळखी माणसांना
हृदयात स्थान देतो,
त्यांना जिवाचे जिवलग
मित्र बनवतो,
न जाणे कुठुन कसा देव
मैत्रीचे नाते जुळवतो.
आयुष्यभरासाठी क्षणाक्षणाची
संगत ती मैत्री देते,
ठेचकाळुन पडताना सावरताना
हात देते ती मैत्री,
सुखदुख:त एकत्र भिजलेली
नाती असते ती मैत्रीे,
जन्मांतरीच्या साथीचे आश्वासन
असते ती मैत्री,
निखळ, निरलस, निरपेक्ष निराकार
असते ती मैत्री,
आदी पासुन अंत:पर्यंत शब्दनिर्बंध
अशी असते मैत्री.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शब्द - कृष्णा जोशी
Thursday, 20 July 2017
रिमझिम पाऊस
रिमझिम रिमझिम बरसतो,
चिंब चिंब भिजवतो पाऊस,
कधी विजेच्या कड कडाटासह,
कधी आभाळाच्या गड गडाटासह,
तो बरसत असतो रिमझिम रिमझिम,
निसर्गाच्या हिरवळीतुन वा-यांच्या झोतासह,
तर कधी कधी मुसळधार धारांसह,
तर तो पाऊस तो पाऊस असाच बरसत असतो,
कधी रिमझिम तर कधी मुसळधार धारांसंग.
✍ शब्द - कृष्णा जोशी
दि. 20-07-2017
Saturday, 8 July 2017
गुरु
ज्ञानाचा महासागर
अखंड वाहणारा झरा
म्हणजे गुरु,
कर्तव्य आणि निष्ठा
भक्ती आणि श्रद्धा
म्हणजे गुरु,
वात्सल्य आणि विश्वास
आदर्श आणि मुर्तिमंत
प्रमाणतेचे प्रतिक
म्हणजे गुरु,
ज्ञान देणारे
शिक्षा देणारे
शिष्याला घडवणारे
म्हणजे गुरु,
आयुष्याच्या सोबतीने
शेवटच्या श्वासापर्यंत
क्षणोक्षणी आठवणारे
म्हणजे गुरु.
माझ्या सर्व गुरुंना
गुरुवर्यांना गुरु पोर्णिमेच्या
हार्दिक शुभेच्छा व साष्टांग दंडवत.
शब्द :- कृष्णा जोशी
Monday, 3 July 2017
विठ्ठल दर्शन
विठ्ठलाच्या दर्शनास भक्त
आज वेडे होती सर्व,
वारकरी वारकरी त्यांस
म्हणत असी सर्व,
मैलोमैली दिंडी मध्ये
गाऊनी अभंग चालत असे
होऊनीया विठ्ठल नामात दंग,
चंद्रभागेच्या तीरावरती
संत गोळा होई विठ्ठल नामाच्या
गजराने मन तृप्त होई,
चंद्रभागेच्या स्नानाने होई
सर्व पुण्यवंत, होई सर्व पुण्यवंत,
सावळा विठ्ठल माझा
भाळी चंदनाचा टिळा
तुलसीहार गळा काशे पितांबर,
विठ्ठलाच्या दर्शनाने भक्तगण
होई धन्य, भक्तगण
होई धन्य.
शब्द - कृष्णा जोशी
दि. 04-07-2017
विठ्ठल दर्शन
विठ्ठलाच्या दर्शनास भक्त
आज वेडे होती सर्व,
वारकरी वारकरी त्यांस
म्हणत असी सर्व,
मैलोमैली दिंडी मध्ये गाऊनी
अभंग चालत असे होऊनीया
विठ्ठल नामात दंग,
चंद्रभागेच्या तीरावरती
संत गोळा होती विठ्ठल नामाच्या
गजराने मन तृप्त होई,
चंद्रभागेच्या स्नानाने होई
सर्व पुण्यवंत होई सर्व पुण्यवंत,
सावळा विठ्ठल माझ्या
भाळी चंदनाचा टिळा
तुलसीहार गळा काशे पितांबर,
विठ्ठलाच्या दर्शनाने भक्तगण
होई सर्व धन्य, भक्तगण
होई सर्व धन्य.
© कृष्णा जोशी
दि. 04-07-2017
Friday, 30 June 2017
वारा
खरंतरं आज काही
लिहायच मनात नव्हंत,
पण या सुटलेल्या गार
वा-याने स्पर्श तुझा जाणवला,
आकाशात तुझ्या आठवणींचा
तुटता तारा दिसला होता,
चंद्राच्या कोरी मध्ये
तुझा हसरा चेहरा होता,
वा-याच्या झोताने दिलेला
तुला पाहण्याचा ईशारा होता,
माझ्या डोळ्यात तुझे रुप
मनात साज श्रृंगार होता,
वा-याच्या प्रवाहा सोबत
स्पर्श तुझाच होता.
शब्द - कृष्णा जोशी
Saturday, 10 June 2017
शांत अशांत मी
काळोख अंधा-या रात्री,
शांत अशांत मी.
गार हवेच्या प्रवाहा सवे,
शांत अशांत मी.
दाटलेल्या ढगां सवे,
शांत अशांत मी.
रिमझिम बरसणा-या
पावसाच्या सरी सवे,
शांत अशांत मी.
विजेच्या कडकडाटा सह
ढगांच्या गडगडाटा सह,
शांत अशांत मी.
आठवणींच्या विरहा सवे,
शांत अशांत मी.
© कृष्णा
Thursday, 4 May 2017
मनातील गुढ
हरणी सारखे डोळेे तुझे,
गुलाबी तुझे गाल,
ओठांवरची लाली तुझी,
करते मन घायाळ,
निरागस सौंदर्य तुझ,
तारुण्य रुप,
कस सांगु मी तुला,
तुझीया रुपाचे मनातील माझ्या गुढ.
✍ कृष्णा जोशी
दि. 4-5-2017
Monday, 1 May 2017
Thursday, 27 April 2017
चाहत
हमे तो सिर्फ आपकी चाहत थी,
पर चाहत ने भी गुमराह कर दिया.
पता भी नही कब हमे,
उसकी चाहत ने गुमशुदा कर दिया.
✍ कृष्णा जोशी
दि. 27-04-2017
राह
हम उसकी राह में कुछ ऐसे मुस्कुरा रहे थे,
वो मुस्कान भी कुछ कातील सी थी.
कंबक्त ए दिल कि धडकने जोरो से धडक रही थी,
जो हमे उसकी याद आ रही थी.
✍ कृष्णा जोशी
दि. 27-04-2017
Tuesday, 25 April 2017
नजरे
आप कि नजरे हमें बस कातिलाना कर गई,
चेहरे का वो रंग होश हवा कर गई,
डिंम्पल वाली मुस्कराहट तुम्हारी
दिल मैं बस गई,
आप कि नजरे बस आप कि नजरे
हमे कातिलाना कर गई.
✍ कृष्णा जोशी
प्रेम, अहंकार
प्रेम माझे तुजवर जडेल जेव्हा केव्हा,
अहंकार दुर करेल तुझा तेव्हा तेव्हा,
अंधारात ही तेव्हा तुजला प्रकाश भासेल,
अंधारात तेव्हा पणती नसता आपल प्रेमच
प्रकाश साचेल.
✍ कृष्णा जोशी
Thursday, 20 April 2017
''तु'' कोण. ''मी'' कोण.
एकांतात बैसोणी मी,
तुज स्मरत असे दिन दिन.
आठवणीत तुझीया मी,
तुज स्मरत असे दिन दिन.
तुज न वाटे काही ,
आठवणींचा माझ्या कळवळा.
ठावुक नसता तु कोण,
प्रेम करतो तुजवर मी पण.
पण भेटशील तु मला जेव्हा,
तेव्हा कळेल तु कोण. मी कोण.
प्रिये ''तु'' कोण.''मी'' कोण.
शब्द - कृष्णा जोशी
Thursday, 13 April 2017
न भेटलेली ती
सापडेल तीही ...
शोधेल मीही ...
कवितेचे शब्द ती ...
लिहीणार शब्द मी ...
ती आणि फक्त मी ...
प्रेमिका ती न भेटलेली मला ...
प्रियकर मी प्रेम तीच्यावर करणारा ...
Wednesday, 12 April 2017
शब्द
कवितेचे शब्द माझ्या
तुझ्याचसाठी असतात.
तु गेलीस की तेही
तसेच अबोल होतात.
त्यांनाही जणु माझ्यासारखी
तुझीच सवय लागली.
अबोल ते शब्द पाहीले तुला की
तुझ्याच सौंदर्याचे गुणगाण करतात.
अबोल ते शब्द तुझ्याचसाठी झुरतात
पाहीले तुला की पुन्हा बोलके होतात.
✍ © कृष्णा जोशी
दि. 12-04-2017
Thursday, 30 March 2017
प्रेम व्यक्त न झालेले
मी ही लिहायचो...
ती ही लिहायची...
मी मनातले प्रेम मांडायचो...
ती मनातले भाव मांडायची...
मी तिला निहारायचो...
अन् ती ही मला निहारायची....
लिहीलेले ते शब्द...
मी माझ्या संग्रहात ठेवले...
लिहीलेले ते शब्द...
तीने ही तिच्या संग्रहात ठेवले..
प्रेम आमचे ईथेच व्यक्त होता होता राहीले...
✍ कृष्णा जोशी
Sunday, 12 March 2017
होली है
ईश्क मै तेरे हम बवाल हो बैठे,
गुलाबी आॅखो मै तेरे हम डुब बैठे.
रंगों की होली है तेरे ये आॅखो मै,
ईस होली के रंग मै हम डुब बैठे.
✍ कृष्णा
Saturday, 4 March 2017
लोकमान्य टिळकांची जीवन यात्रा
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
जसजसा काळ जातो, तसतसे अनेक नेते लुप्त होतात; पण लोकमान्य टिळकांनी जी शाश्वत मूल्ये मांडली. त्यांचे तेज अजून चमकत आहे. लोकमान्य टिळकांनी चाळीस वर्षे खपून या भूमीत लोकशाहीचा भक्कम पाया घातला. `गीतारहस्य’ लिहून कर्मयोग सांगितला. त्या वेळी असलेली युरोपियन साम्राज्यशाही नष्ट होणे, हे केवळ भारतासाठीच नव्हे, तर अखिल मानवजातीच्या हितासाठी आवश्यक आहे, असे विचार त्यांनी मांडले. `भारताचे स्वराज्य हा काही विशिष्ट जातीपुरता किंवा भारतापुरताच मर्यादित नाही, तर पृथ्वीच्या सहाही खंडांत पसरलेल्या ब्रिटीश साम्राज्याचा किंवा मानवजातीच्या हिताचा प्रश्न आहे’, असा दृष्टीकोन त्यांनी समाजमनावर ठसवला.
लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव पण ‘बाळ’ हे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. लोकमान्य टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले. पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.
सन १८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधुन केले. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.
विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यु इंग्लीश स्कूल’ ची स्थापना केली. टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत ‘मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत ‘केसरी’ ४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर ‘केसरी’चे तर टिळक ‘मराठा’ चे संपादक बनले. टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे 'डेक्कन ऐज्युकेशन सेसायटी' ची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने ‘फर्ग्युसन कॉलेज’ सुरु करण्यात आले.
यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी ‘केसरीच्या’ संपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक ‘केसरी’चे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले.
गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला ‘शिवजयंती उत्सव’ १५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.
- कृष्णा जोशी