मजला सांग सख्या रे ।।

0

 मजला सांग सख्या रे ।।

कोण आहे इथे अन् कोण आहे तिथे
मजला सांग सख्या रे ।।

तुजविण जरी झाले श्वास उणे
श्वासात तुझेच भास नवे,
हवे हवे हे गंध हवे
श्वास तुझे अन् भास तुझे.

मजला सांग सख्या रे ।।

तू स्वप्न हे जणू आयुष्याचे
मी गाईल गीत आठवांचे,
त्या त्या त्या क्षणांचे
बिलगून तुझीया मिठीत रे.

मजला सांग सख्या रे ।।

जगणे माझे व्यर्थ न व्हावे
आयुष्याचे अर्थ उलगडावे,
तू लाजावे अन् तू हसावे
तुझीया भेटीचे चीज व्हावे.

मजला सांग सख्या रे ।।

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)