स्पर्श

0
हाताच्या स्पर्शाने लाजाळूने लाजावे
खुलून कळी फुल गंधीत व्हावे
आजचे अनुभव उद्या आठवणीत विरावे
आनंद कोणाला मोजता आले
मोजल्या का कोणी वेदना कधी
कुठल्या स्पर्शास भावना कुठली
पहिला स्पर्श असतो आईचा
नवजात जन्मलेल्या बालकाला
दुसरा स्पर्श बाबांचा
जबाबदारीचं ओझं घेतलेल्या हातांचा
ही भावना असते प्रेमाची मायेची
कधी स्पर्श होतो वासनेचा हा
देह कुस्करून टाकणाऱ्या राक्षसांचा
कधी स्पर्श होतो प्रेमाचा
अंगावरी काटा शहारणारा
देहात चैतन्य फुलवणारा
खरा स्पर्श तो निसर्गाचा
सोनेरी उन्हाचा कवडसा सावलीचा.

- कृष्णा अच्युतराव जोशी
अहमदनगर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)