तरुण आहे रात्र अजूनी ...

0
तरुण आहे रात्र अजूनी जीव वेडा होतो
चांदण्यांच्या सहवासात चंद्र लाजरा होतो
तारुण्याच्या प्रखर शिरावरी मनास बहर येतो
तरुण आहे रात्र अजूनी जीव वेडा होतो,

वेडावल्या या जीवाचा कधी -हास होतो
रात्रीत जगण्याचा नवा ध्यास होतो
ध्यासात धुंद मी मायेचा घास होतो
घास घालीता माय, मी तिचा सहवास होतो
तरुण आहे रात्र अजूनी जीव वेडा होतो,

या रात्रीत मी वेडा तुटता तारा होतो
अनेक ईच्छा घेऊन, मी ही लुप्त होतो
शोधीत मजला सारेच, मी भास होतो
तरुण आहे रात्र अजूनी जीव वेडा होतो,

रात्रीत जगण्याचा सखे एक नवा इतिहास होतो
या आयुष्याच्या इतिहासात मी तुझेच नाव होतो
तू मी एक अन् संसार सारा एक होतो 
तरुण आहे रात्र अजूनी जीव वेडा होतो,

क्षणभर मी वेडा तुझा श्वास होतो
श्वासात गंधाळलेला मी तुझाच भास होतो
भासात तू जरी मी तुझाच खास होतो
तरुण आहे रात्र अजूनी जीव वेडा होतो.

- कृष्णा जोशी 😍

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)