शेतकरी

0

शेतकरी

आपण फक्त तोंडाने बोलण्यात खुप पटाईत आहोत.
रोज जे अन्न खातो , गहु , ज्वारी , बाजरी,  पालेभाज्या, कांदा, इत्यादी, फक्त अन्न नाही तर स्वयंपाक करण्यासाठी लागणारे तेल, मिरची, मोहरी, जिरे, हळद, इत्यादी, पुरवठा हा आपल्याला शेतकरी करत असतो पण त्या शेक-याला किती कष्ट कराव लागतात हे कोणालाच माहीत नाही त्यातच आपण तोंडाने बोलायला पटाईत आहोत, तिकडे डोमिनोज चा 100-200 रुपयाचा पिझ्झा खाताना कधी आपण विचार नाही करणार पण मात्र बाजारात भाजीपाला घ्यायला गेल की मग आपल्याला महागाई वाटते खर तर ती महागाई नसतेच ती असते ती शेतक-याची कष्टाची कमाई मग तीथे आपण विचार करुन चार-पाच रुपये कमी करुन तो भाजीपाला घेतो , त्या डोमिनोझ च्या पिझ्झा मध्ये ही शेतक-याने पिकवलेलाच भाजीपाला असतो हे ही लक्षात राहु द्या.

आता तुम्ही हे म्हणताला आता तुच राहीला होतास हे आम्हाला सांगायच पण खरच शेतकरी काय कष्ट करतो ना एक दिवस शेतात त्या शेतक-या सोबत काम करुन पहा रात्र भर झोप येणार नाही आणि पहाटे उठता येणार नाही अशी गत होईल तुमची.  चार- पाच दिवस झाले शेतीचा अनुभव घेतोय म्हणुन तुम्हाला हे सांगावस वाटल, मी आत्ता पर्यंत हे बरेच वेळेस ऐकलय डाॅक्टर चा मुलगा म्हणतो मी डाॅक्टर होणार , इंजीनियर चा मुलगा म्हणतो इंजीनियर होणार असे बरेच उदाहरण आहेत. पण सध्या शेतक-याचा मुलगा अस म्हणत नाही की मी शेतकरीच होणार याला ही कारणीभुत तुम्ही-आम्हीच आहोत. पाणी देण्यापासुन त्या पिकाला संभाळण त्याला फवारणी असो अजुन काही बरेच कष्ट करुन ही विकायला गेल की त्याला भाव मिळत नाही  मग ऐवढे कष्ट करुन ही त्याला हवा तसा नफा मिळत नाही म्हणुनच शेतक-याचा मुलगा मला शेतकरी व्हायच अस म्हणत नाही.

त्यात त्यांच्या वर कर्जाचा डोंगर आता आपण अस ही म्हणतो शेतकरी कर्ज करतो मग तो फेडत का नाही, परत सरकार ही शेतक-याचा कर्ज माफ करत असतो तरीही त्यांच्या  डोक्यावर तेवढेच कर्ज आहे, पण याला ही कारणीभुत आपणच की आपल्याला शेतक-याने पिकवलेले अन्न धान्य स्वस्त हवय. मग कस फिटणार त्यांच कर्ज , सरकारी नोकर दारांना सातव वेतन आयोग हवय पण शेक-याने कष्टाने पिकवलेल्या आपल्याला लागणार अन्न धान्य स्वस्त हवय , त्यामुळे शेक-याला नफा होत नाही आणि कर्जा मुळे आत्महत्या करतो.
मी म्हणतो एकदा त्या केंद्र सरकार व राज्य सरकारी कर्मचारी लोकांना शेतीत दारे धरायला व पेरणी करायला लावायला पाहीजे मग कळेल कोण किती कष्ट करतय ,तस माझा मुद्दा सरकार व त्यांच्या कर्मचा-यांचा नहीच हे, पण आपला महाराष्ट्र कृषि प्रधान देश आहे तर आपण त्याला प्राधान्य दिल पाहीजे , आज महाराष्ट्रा मध्ये शेती व्यवसाय कमी होत चाल्लाय. त्यास आपण प्राधान्य द्यायला हवं .

मी लेखक नाही पण मनात त्या शेक-यांन बद्दल तळमळ वाटली म्हणुन हा लेख लिहीला आहे.

त्यास आपल्या प्रतिक्रिया ही द्या.
काही चुकल असल तर माफी मागतो.

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)