स्पर्श
प्रेमाचा, मायेचा, वात्सल्याचा
जन्मदात्या माझ्या आईचा
प्रेम, ममता सदैव पाठी तिची छाया
मायाळु माझी माय
प्रेमळ तिची माया,
स्पर्श
माझ्या बाबांचा
बोट धरुन चालायला शिकवलस
कठोर होऊन आयुष्यात
ऊभ राहायला शिकवलस
राबराब राबलास कधी नाही थकलास
असाकसा रे बाबा तु कधिच नाही रडलास
तुच शिकवलस काटयातुन वाट कशी काढायची
अन् आयुष्याला दिशा कशी दाखवायची
स्पर्श आईचा अन् बाबांचा.
शब्द - कृष्णा जोशी