या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

0
या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
  
            या जन्मावर या मरणावर शतदा प्रेम करावे ह्या ओळी खरंच मनाला स्पर्शुन जातात, ९ महिने ९ दिवस आईच्या पोटात राहुन आईनेही यातना सहन करुन आपल्याला जन्म दिलाय आणि या आपल्या आयुष्यावर आपल्याही पेक्षा जास्त प्रेम कोणी केल असेल तर तेही आईने म्हणुनच या जन्मावर शतदा प्रेम करा,
          जीवन ही रंगभूमी आहे. जीवन दोन घडीचा डाव आहे तो एक संघर्ष आहे अश्या अनेक व्याख्या जीवनाच्या आहेत, जगणे हा जीवनाचा अनुभव आहे जीवनात चढउतार असणार जीवन म्हणजे उन-सावलीचा खेळ असतो, खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक जीवनात काहीच असु शकत नाही.
            जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे, तिचा चांगला उपयोग करणे महत्वाचा आहे, क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन शोक करत बसण्यापेक्षा, त्याचा चांगला उपयोग करावा,त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगड्याचा पाय व्हावे, अनाथाचे पालक व्हावे, दुस-याला आनंद द्यावे, दुस-यासाठी जगावे.
         आयुष्याचे चीज व्हावे
         जीवनाचे गीत व्हावे
          एैसेची जगत रहावे
    या जन्मावर शतदा प्रेम करावे.
           जगावे, जगु द्यावे, जगता-जगता जीवनाकडे पहावे, जमेल तेवढे जाणावे या जाणिवाचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे.
           जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनाचे ब्रह्म रुप दिला की चार पिढ्यांचे आर्शीवाद देणारा भिक्षू, शाळेच्या प्रांगणात बालगोपाळांच्या कंठातुन पडणारे प्रार्थनागीत अशा अनेक अंगांनी नटलेले सजलेले हे जीवन किती विलोभनी आहे.
अशाच कितीतरी गोष्टी जगण्यासाठी उत्साह, प्रेरणा देतात म्हणुनच या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
- कृष्णा जोशी, अहमदनगर
( instagram | @kinchit_kavi )


https://www.instagram.com/kinchit_kavi/?hl=en

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)