असेही एकदा व्हावे
तू त्या वळणावर भेटावे
ढग दाटून यावे धुंद पावसाने बरसावे
चिंब चिंब तू अन मी भिजावे
अलगद त्या थेंबाने तुझे ओठ स्पर्शावे
धुंद या भिजतच राहावे ,
असेही एकदा व्हावे
मी येते सांगून
तू निघून जावे
तुझी वाट पाहत
मी त्या वळणावर बसावे
असेही एकदा व्हावे
दुःख तुझे, अश्रू माझे असावेत
सोबतीने तुझ्या मी खूप रडावे
अश्रूंच्या हुंदक्यात दुःख तू विसरावे
असेही एकदा व्हावे
लिहिलेल्या असाव्यात मी
अनेक कविता डायरीत माझ्या
तू तिचे शेवटचे कोरे पण निघावे
असेही एकदा व्हावे
तुझी चाहूल वाटावी
तुझे पाऊल वाजवे
तुझी भेट व्हावी
तू समोर उभी असावी
ते कोरे पण भरून निघावे
असेही एकदा व्हावे.
- कृष्णा जोशी 😍