मी का नाही

5
आपल्याच आयुष्याचे गणित
कधी स्वतःला उलगडत नाही
नाकारलेच कोणी तर
विचारतो मी का नाही,
हवं असतं सगळं काही
हवी असतात माणसे ती
नाकारलेच कोणी तर
विचारतो मी का नाही,
असतात स्वप्ने मोठी
साकारत प्रत्तेक नाही
नाहीच साकारली तर
विचारतो मी का नाही,
जीवनात सुख दु:ख असते
असतात अनेक अडचणी
नाहीच मिळाले सुख तर
विचार करत बसु नका
मी का नाही, मी का नाही.
- कृष्णा जोशी, अहमदनगर

Post a Comment

5Comments
Post a Comment