आरसा

0
तुझ्या घरातला तो नक्षीदार आरसा
त्यात तुझी छबी मला रोज दिसायची
तू स्वतःलाच आरश्यात पाहून निहरायचीस
दिसली असेल चोरून तुला पाह्तानाची माझी छबी 
पण एक मात्र तू रोज त्याच वेळेला
आरश्या समोर उभी असायची
कधी वेणीची बट सावरायची
कधी डोळ्यांत काजळ भरायचीस
अन कधी त्या गुलाबी ओठांवर
लालीचा रंग चढवायचीस
हे मात्र खरं कि तू हे
माझ्याचसाठी करायचीस
नाही दिसलो कधी मी दारात उभा कि
तू कावरी बावरी व्हायचीस
हि सगळी गंम्मत तुझ्या त्या
नक्षीदार आरश्याची असायची.

- कृष्णा जोशी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)