तू पुन्हा येऊ नकोस

0
भाव मनीचे जागवाया
आठवणीत रमायला
तू पुन्हा येऊ नकोस,

विसरतोय तुझ्या आठवणींना
तु दिलेल्या विश्वासांच्या तड्याला
तू पुन्हा येऊ नकोस,

स्वप्नात पहिलेल्या तुझ्या गोड रुपाला
तुझ्या निरागस हास्यातुन
माझ्या मनाला भाळवायला 
तू पुन्हा येऊ नकोस,

तुला शोधायला नजर माझी 
तरी देखील फिरत असते
चंद्र ता-यांकडे पाहुन आठवण 
तुझी रोज येत असते,

तुला विसरण्याचा प्रयत्न मी करतोय
तुला विसरण्याकरता रोज कविता करतो
अन् त्या कवितेत तुलाच आठवतोय,

तू पुन्हा येऊ नकोस
भाव मनीचे जागवाया
आठवणीत रमायला
तू पुन्हा येऊ नकोस.

© कृष्णा जोशी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)