दिवाळी

0
पुन्हा आली आज दिवाळी
नातीगोती हरवलेली
तुम्हीच सांगा रसिक प्रेक्षक हो
राहिली का दिवाळी पुर्वीसारखी रंगलेली,

चार आठ दिवस आधी
धामधूम असायची दिवाळीची
चकल्या करंज्या लाडू चिवडा
आई आमची करत असायची,

शेजारच्या काकूंना सुद्धा
आई आमची मदत करायची
हल्ली कुठे राहिला शेजार
काकू देखील शिकल्यात फराळ,

खरी मज्जा तेव्हाच होती
पहाटे उठून अभ्यंग स्नानाची
उटणे लावून अंगाला
किलोभर मळ काढण्याची

हल्ली उठतात आठ वाजता
दिवाळी आहे म्हणे
करा तयारी फराळाची
अहो कसली आली दिवाळी
उत्सवात होत असायचे सण
मज्जा आता हरवली,

फराळ घेऊन रामबंधु चितळे आले
आपल्या खरेदीचे मुहूर्त लक्ष्मी पूजनावर गेले
नातीगोती विसरलेत हो सारे
बंद दारा आड होती दिवाळी
मनात फुटतात उत्सवांचे फटाके.

© कृष्णा अच्युतराव जोशी
अहमदनगर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)