मृत्यू

0
आता जगायाचे असे माझे
किती क्षण राहिले
प्रत्येक क्षणाला माझे श्वास
मी तुझ्या श्वासात मोजले,

उरलो किती मी माझा
प्रश्न मला भेडसावत आहे
आता जगायाचे असे माझे
किती क्षण राहिले,

जीर्ण देहाचे जरी तुकडे झाले
प्रत्येक तुकड्यात तूझ्या सोबतीचे
श्वास आहे,

जरी सरणावर पेटली चिता माझी
त्या आगे मधूनी मी तुला पाहत आहे
तू तेव्हा अश्रू ढाळू नकोस
तुझ्या हास्यात माझा श्वास अडकला आहे,

उरली जरी राख माझी
तुझ्या हाताने गंगेत सोडून दे
राखेत वाहून गेलो जरी मी
खरा मी तुझ्यात उरलो आहे.

- कृष्णा जोशी😍

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)