तुझ्या हास्याने हा आत्मा अनंतात चैतन्य फुलून बहरत होता, वेडा होऊन बागडत होता, हळूच कोणी पुटपुटला हा प्रेमवेडा दिसतोय. प्रेमवेडा म्हणजे काय ? हो कोणाला तरी खूप जीव लावणं, जीवापाड प्रेम करणं ज्याच्याविना जगणे पुरे नाही. आई, बाप, बहीण, भाऊ, प्रेयसी, बायको अशी अनेक माणसं असतात जीवापाड प्रेम करणारी जीव लावणारी, तितकाच जीव आपला ही असतो.
आता तूम्ही म्हणाल याचा आत्मा अनंतात चैतन्य फुलून बहरतोय याला कुठलं प्रेम म्हणायचं, हे प्रेम नक्कीच वेगळं होत, जस श्रीकृष्णाचं राधेवर होतं, मिरेच श्रीकृष्णावर होतं, निस्वार्थी, निस्सीम कुठलाही मोह माया नव्हती त्या प्रेमावर, "जैसे कि राधे बिना क्रिष्ण कहा."
तसच काहीसं माझं होत, तुलना श्रीकृष्णाशी किंवा राधेशी करायची नाही पण अगदी तितकंच खरं निस्वार्थी प्रेम होतं.
हे सगळं वाचून मी खरंच अनंतात विलीन झालोय अस समजू नका. मी इथेच आहे, इथे म्हणाल तर कुठे ? जो हे वाचतोय तोच मी आहे, आणि जे हे लिहिलंय तोच मी आहे, आता तुम्ही विचार कराल, मी कुठे आहे ? आता पुन्हा वाचा आणि तो मी स्वतः आहे अस समजा, मग कळेल खरा मी कोण आहे, आणि तो कुठे आहे ?
वास्तविकते कडून कल्पनिकते कडे जाताना माणूस खऱ्या अर्थाने बदलतो का ? बदलत असेल पण तो तितकाच खरा ही असेल, कारण विचारांची गाडी धावत असते तिला थोडं आचरणात आणलं की थांबते ! मी थांबलो तिथून खरा प्रवास सुरु झाला आणि "अनंतात चैतन्य फुलून बहरत असणारा आत्मा पुन्हा जिवंत झाला," तिच्या सोबतीने आज तो बहरतोय, नदी काठी पाण्यात पाय सोडून बसतोय, कधी हसतोय, कधी रडतोय पण जीवापाड प्रेम करतोय, अगदी तसच.
"जैसे कि राधे बिना क्रिष्ण कहा."
"मीरा का हैं क्रिष्ण सखा."
- कृष्णा जोशी