जगता जगता राहून गेलं ...

1 minute read
9
           एकदा बघ विचार करून तिथे स्मशानात त्या सरणावर माझाच देह असेल, म्हणजे अगदी कालपर्यंत तुझ्या सोबत हसत खेळत असलेलो मी आज तुला अनेक आठवणी देऊन तिथे शांत निजलेलो आहे, ओळीत मांडायचं झालं तर..

"दुःख कुठलेच नव्हते
शांत निजलो होतो,
तुझ्या अश्रूंनी मी
चिंब भिजलो होतो,
तसा अनेकांसाठी मी
तिथेच संपलो होतो,
तुझ्या आठवणीत मी
आता कायमचा विसावलो होतो."


            असच काही जीवन जगता जगता घडून जात, कोणी आठवणीत राहून जात कोणी विसरून जात.

"शेवटी आठवणीच असतात
श्वास थांबतो उरतो देह
मोक्ष नाही आत्मा तल्लीन
आसक्त जीवनाचा सोडावा मोह"


                      जीवनात मोह खूप काही करून घेतो, मला मोह होता तुझाच, तुझ्या श्वासांत विरण्याचा तुला नेहमी पाहत राहण्याचा मी म्हणायचो बघ "तू हसताना किती गोड दिसतेस, जणू आकाशातील चमचमणारी चांदणी भासतेस."   आज तिथेच विसावणार मी, इथेही तूच सोबत होती आणि तिथे ती चांदणी, अस म्हणतात माणूस मेल्यावर आकाशातला तारा होतो जर खरंच तारा होत असेल तर मला त्या चांदणी शेजारी बघ जिच्यात तुला मी पाहायचो कारण देवाकडे मी शेवटची ईच्छा तीच मागितली होती, मला माहीत होतं सप्तपदी घालून सात जन्माचं वचन घेऊ शकणार नाही मी, पण जन्मोजन्मी तुझ्या सोबती तिथे तारा बनून राहील हे तर नक्की, मी गेल्यावर तू रडशील की नाही माहीत नाही पण, जेंव्हा जेंव्हा आठवण येईल तेव्हा फक्त आकाशात पहायचं आणि त्या ताऱ्याकडे पाहून हसायचं म्हणजे माझा या देहातून अनंतात गेलेल्या आत्म्याला चैतन्य फुलेल तुझ्या हास्याचे.

क्रमशः ...






Post a Comment

9Comments
  1. अप्रतिम मित्रा, असच लिहीत जावे शुब्दफुले,
    दरवळेल शब्द सुमनांचा सुगंध या भूतलावी
    आपल्या लेखणीने
    धन्यवाद

    ReplyDelete
  2. खूप अप्रतिम

    ReplyDelete
  3. अप्रतिम🙌🙌🙌लाजवाब😇

    ReplyDelete
Post a Comment