नमस्कार मी रविवार बोलतोय ...

0
नमस्कार मी रविवार बोलतोय, अहो काय विसरलात की काय तुम्ही मला, महिनाच झालाय फक्त, नेहमी सारख माझ्याशी तुम्हाला वागत येत नाही पण काय मंडळी तुम्ही मला पार विसरूनच गेलात, किती आतुरतेने वाट पहायचे बर माझी, सगळं माझ्यामुळे मिळणाऱ्या सुट्टीवर अवलंबून असायच तुमचं, कोणाला मनसोक्त झोप हवी असायची तर कोणाचा पिकनिक ला जायचं असायचं, कधी एकदा रविवार येतो आम्ही सगळे मित्र एकत्र येतो party करतो असे सगळ्यांचेच प्लॅन माझ्या जीवावर अवलंबून असायचे, पण काय महिनाभरात विसरलात मला, मी समजू शकतो हो ह्या कोरोना मुळे तुमच्या आयुष्याचा रविवार झालाय पण माझा काय दोष हो, मी ही अगदी तुमच्या सारखा निश्चिंत होतो, रोजचच जीवन सुखाचं पण हे सुखं हरवलं, अगदी दुःखी झालात अस मी म्हणणार नाही, पण घरा बाहेर निघणं अवघड झालं रोजचं धकाधकीच जीवन शांत झालं, ह्या शांततेने इतक्या वर्षात न समजलेले आई-बाबा भाऊ-बहीण खऱ्या अर्थाने समजले असतील, घर म्हणजे काय याची व्याख्या पाठ झाली असेल. 
तुम्ही मला विसरलात तरी हरकत नाही पण ते घरपण जपा, घरातच राहून स्वतःलाही जपा, मी कुठे जाणार मी आहे इथेच तुमची वाट बघत भेटू आपण लॉकडाऊन संपलं की, तोपर्यंत मज्जा करा घरात राहूनच. Bye bye.
#Happy_Sunday
.
. - कृष्णा जोशी 😍

Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)