मी गेल्यावरच दुःख ...

0
मी गेल्यावरच दुःख तुला कळणार नाही
माझ्या अस्तित्वाचे प्रश्न तुला उमगणार नाहीत
असेल ती सारी अंधारमय रात्र
पौर्णिमेला देखील चंद्र दिसणार नाही
तुला पाहून चांदण्या हसणार नाही
मी गेल्यावरच दुःख तुला कळणार नाही,


उरतील मागे आठवणी माझ्या
लिहून ठेवलेल्या कविता थोड्या
असेलच माझ्या अस्तित्वाचे पुरावे काही 
तर तेही देतील मी असल्याचा भास काही
मी गेल्यावरच दुःख तुला कळणार नाही,

पेटेल चिता माझी राख देह होईल
तुझ्या जवळ असलेला गंध माझा 
मी असल्याचे पुरावे देईल
मी गेल्यावरच दुःख तुला कळणार नाही,

तू रडशील, मात्र तू स्वतःला सावरशील ही
चार दिवसाच दुःख असेल
पुन्हा तू मला विसरशील ही
मी गेल्यावरच दुःख तुला कळणार नाही,

मी होतो वेडा, मी म्हणायचो की,
लिहिल्या कविता, मांडल्या भावना,
कधी त्यातही लिहिल्या होत्या वेदना 
तू त्याही ही समजल्या नाहीस
मी गेल्यावरच दुःख तुला कळणार नाही.

- कृष्णा जोशी 😍

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)