हळहळ

0 minute read
0

 

कुठे भेटली मला कविता अन् 

नेमकी कोणती वाट चुकली,

दुःख मांडायला कवितेतुनी

मनाची हळहळ किती दाटली,


वृत्त कोणते, कोणता काफिया 

अन् रदीफ ही त्यास नाही,

कोणास सांगायच्या नेमक्या वेदना मी

नेमकी त्या वळणावर ग़ज़ल भेटली,


शब्द थोडे वेचले मी अन्

माझिया दुःखाची कविता झाली,

सुखाने हासलो जरा मी अन्

माझिया हास्याची ग़ज़ल झाली.


- कृष्णा जोशी 😍




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)