शब्दांची फुले

0 minute read
0


 तू कवितेला दाद दिली

शब्दांची मग फुले झाली

वेचून तू त्या फुलांना 

गजरा त्याचा माळशील का ?


पुन्हा आवडलीच कविता माझी

तर दाद मात्र देशील ना, 

शब्दांना त्या मनात भरून 

श्वासात त्यांना गुंफशील ना.


कवितेला हवीशी असतेस तू 

तुला हवी असते माझी कविता,

भावनांनी मी वाहून जातो 

म्हणूनच की काय जणू 


उतरत जाते लेखणीतून 

माझ्या श्वासांची तुझ्या आठवांची 

भावनांनी गुंफलेली, अनामिक एक

ती शब्दांची फुले झालेली कविता. 


- कृष्णा जोशी 😍





Post a Comment

0Comments
Post a Comment (0)