शाळेची मज्जा

0
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची,
ती आमच्या शेजारी, समोर का मागे बसायची,
हे आम्हाला माहीतच नसायची.
कारण तेव्हा आम्हाला प्रेम काय असत माहीच नसायच.
शाळेत आमच्या खुप मज्जा असायची.
प्यार, ईश्क, Love, मोहब्बत याची कोणाला चिंता नसायची,
मैत्रीणीच आमच्या बहीणी मित्रच आमचे भाऊ वर्ग आमचे घर हेच आमच कुटुंब असायच,
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची.
जेवणाच्या सुट्टीची आम्हाला आस असायची,
कारण जेवणा पेक्षा आम्हाला चिंच, बोर, कै-या, जांभुळ
खाण्याचीच आवड असायची?
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची.
मग शाळे जवळच्या शेतांमध्ये आमची टोळी घुसायची,
चिंच,बोर, कै-या, जांभुळांनी आमची खिसे भरायची.
30 मिनटाच्या सुट्टी मध्ये दिवस भराची धमाल व्हायची.
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची.
परतुन शाळेत आल्यावर मात्र वर्गातील मुली चिंच, बोर, कै-या, जांभुळ मागायची ,
मुल मात्र खोडकर तोंडाला पाणी सोडत त्यांचा गुटूगुटू खायची.
मैत्रीणी आमच्या त्या नाराज झाल्या का आम्ही त्यांना प्रेमान तीे नेऊन द्यायची.
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची.
गणिताचा तास आमचा असायचा खास कारण,
गणिताच्या बाई आमच्या आणायच्या खाऊ खास.
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची.
इंग्रजीच्या तासाला मात्र सगळ्यांची गंम्मत असायची,
आमची टोळी खिडकीतुन पळुन जायला एक्सपर्ट असायची.
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची.
दिवस भराची मस्ती होऊन मग 5 च्या घंटेची वाट पहायची.
सुट्टीची घंटा झाली की बाजुच्या टपरीतुन बोरकुटची पुडी घेऊन खात घरी निघायची.
शाळेत आमच्या खूप मज्जा असायची.
                              ✍ शब्द - कृष्णा  जोशी
(टिप- कवितेतील सगळ्या ओळी माझ्या जिवनातील व आम्ही केलेल्या शाळेतील मस्तीच्या दिवसातील आहेत.)

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)