श्रृंगार

0

असा कसा तुझ्या मनाला ठाव देऊ

मी माझ्याच दिलावर आता घाव देऊ.


जिंकता आले तर बघ घे जिंकून सारे

मी कशाला उगाचच तुला वाव देऊ.


तसे नाव तुझे निरंतर घेतले जातेच म्हणा

मी कशाला पुन्हा नव्याने नाव देऊ.


रस्ते अनेक शोधले मी तुझ्या रहदारीचे 

मी पत्त्यावर तुझे कोणते गाव देऊ.


रूप तुझे असे जसा वार होतो कट्यारीचा

 मी तुझिया श्रुंगाराला का भाव देऊ.


- कृष्णा जोशी.




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)